Lyrics

घडीत चिमणी बसे अंगणी चोचीने टीपते दाणे ओ, चोचीने टीपते दाणे (घडीत चिमणी बसे अंगणी) (चोचीने टीपते दाणे) (हो, चोचीने टीपते दाणे) इकडे बघते, तिकडे बघते चिव-चिवते, गाते गाणे (इकडे बघते, तिकडे बघते) (चिव-चिवते, गाते गाणे) घडीभर नाचून, दाणे वेचून डोळे मिटून ती बसते (घडीभर नाचून, दाणे वेचून) (डोळे मिटून ती बसते) पंख उभारून उडते भुर्रकन (पंख उभारून उडते भुर्रकन) पालवित हिरव्या घुसते (पालवित हिरव्या घुसते) हिचे न काही कळते बाई घडीत गाठते आभाळ (हिचे न काही कळते बाई) (घडीत गाठते आभाळ) कसे नि कोठे? बांधी घरटे करी पिलांचा सांभाळ (कसे नि कोठे? बांधी घरटे) (करी पिलांचा सांभाळ)
Writer(s): Abhijeet Limaye, Shanta Shelke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out